ब्लडी डॅडी फिल्म रिव्ह्यू | Bloody Daddy Film  Review. 

फिल्म :  ब्लडी डॅडी 
कालावधी :  २ तास १ मिनिटं
दिग्दर्शक:  अली अब्बास जफर 
कथा पटकथा आणि संवाद :  आदित्य बसू, अली अब्बास जफर
छायाचित्रण: मार्सिन लास्काविक
संकलक:  स्टीव्हन एच. बर्नार्ड
पार्श्व संगीत: बादशाह, आदित्य देव,अनुज गर्ग आणि ज्युलियस पॅकियम
मुख्य कलाकार :  शाहिद कपूर, जिषान कादरी, रोनित रॉय, संजय कपूर, राजीव खंडेलवाल,एमी एला, अंकुर भाटिया, डायना पेंटी, विवान भटेना.
कुठे पाहू शकता : जिओ सिनेमा 

Bloody Daddy Film  Review २०११ सालातील फ्रेंच फिल्म न्युट ब्लांच’ (स्लीपलेस नाईट) या फिल्मचा ‘ब्लडी डॅडी’ हा ऑफिशियल रिमेक आहे. २०१५ साली तमिळ भाषेमध्ये देखील  ‘थुंगा वणंम‘ या नावाने आधीच एक रिमेक बनविण्यात आलाय, ज्यामध्ये कमल हसन ने काम केले आहे.गुंडे, सुलतान, टायगर जिंदा है, यासारखे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या अली अब्बास जफरने ब्लडी डॅडी चे दिग्दर्शन केले आहे.

Bloody Daddy Film  Review.
Shahid Kapoor in Bloody Daddy
शाहिद कपूर- ‘ब्लडी डॅडी’ फिल्म मध्ये सुमैर च्या भूमिकेत

गोष्ट काय आहे । What is the story of Bloody Daddy

चित्रपटाची कथा घडते करोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या काळात. नार्कॉटिक्स ऑफिसर असणारे सुमैर (शाहिद कपूर) आणि जग्गी (जिषान कादरी– गँग्स ऑफ वसईपुर फेम डेफिनेट) एका गाडीवर हल्ला करून 50 कोटी रुपयाचे ड्रग्स लुटतात, येथे लुटतात हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे नार्कोटिक्स ऑफिसर असूनही त्यांचा हा माल विकून पैसा कमविण्याचा मानस असल्याचे आपल्याला कळते. 

त्याच वेळेस या ड्रग्स चा मालक असणारा आणि सेव्हन स्टार हॉटेलच्या धंद्याखाली ड्रग्स रॅकेट चालविणारा सिकंदर चौधरी (रोनित रॉय) सुमैर च्या मुलाला किडनॅप करतो. मुलाला सोडविण्यासाठी तो सुमैर ला सगळे चोरलेले ड्रग्स घेऊन त्याच्या हॉटेलवर यायला सांगतो. हे सर्व होत असताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे इतर दोन नार्कोटिक्स ऑफिसर्स समीर (राजीव खंडेलवाल) आणि आदिती (डायना पेंटी) हे देखील सुमैर चा मागोवा घेत त्याच हॉटेलमध्ये येतात. यानंतरचा चित्रपट त्या एका रात्रीत सुमैर त्याच्या मुलाला सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला त्याच्यात येणारे अडथळे हे सगळे दाखवतो.

Bloody Daddy Film  Review. Ronit Roy
रोनित रॉय -‘ब्लडी डॅडी’ फिल्म मध्ये सिकंदर चौधरी च्या भूमिकेत

सुमैर त्याच्या मुलाला सोडविण्यात यशस्वी होतो का? तो नक्की नार्कोटिक्स ब्युरो च्या बाजूनी आहे का ड्रग्स माफियांच्या बाजूने? हे सगळं फिल्ममध्ये पाहणंच उचित ठरेल. 

चित्रपट कसा आहे ? | How is the Bloody Daddy film ?

चित्रपट वेगवान आहे आणि काही प्रसंगात तो तुम्हाला धरून ठेवतो. विशेषतः चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा ड्रग्स लुटण्याचा प्रसंग किंवा ड्रग्स आणि पीठ याचा किचन मधील एक प्रसंग ज्याची झलक तुम्ही ट्रेलर मध्ये देखील पाहिली असेल. 

अनुराग कश्यप किंवा राज अँड डिके यांच्या चित्रपटात दिसून येणारा ब्लॅक ह्युमर इथे करोणा च्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतो. वास न येणे, गो करोणा गो हे गाणं, मास्क बदली होणे असे अनेक करोणा संदर्भ हसू आणतात. 

Bloody Daddy Film  Review. Rajeev Khandelwal in Bloody Daddy
राजीव खंडेलवाल- ‘ब्लडी डॅडी’ फिल्म मध्ये समीर च्या भूमिकेत

चित्रपटाची मुख्य त्रुटी वाटते ती म्हणजे भावनिक दृष्ट्या तो तुम्हाला जोडून घेऊ शकत नाही. चित्रपटाच्या नावावरून आणि कथेवरून एका बापाचा आपल्या मुलाला सोडविण्याचा संघर्ष जरी इथे असला, तरी बाप आणि मुलगा यांच्यातील भावनिक नाते तितक्या प्रभावीपणे आपल्यासमोर येत नाही. त्यामुळे प्रेक्षक म्हणून पाहतानाही आपण त्यात गुंतत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर फॅमिली मॅन या वेब सिरीज मध्ये मनोज वाजपेयी आणि त्याच्या मुलांमधील नाते फार छान पद्धतीने दाखविण्यात आले आहे, त्यामुळेच सिरीज मध्ये ज्यावेळेस त्याची मुलगी किडनॅप होते, त्यावेळेस मनोज वाजपेयी ची जी घालमेल होते, तीच घालमेल प्रेक्षक देखील अनुभवू शकतात. या ठिकाणी मात्र तसे होत नाही. 

ॲक्शन म्हणून येणारे अनेक दृश्य ही उत्कंठा वाढवणारी कमी आणि स्टायलिश जास्त वाटतात. शेवटाकडे येणारे बादशहाचे गाणे देखील असेच अनावश्यक आणि घडत असणाऱ्या ऍक्शन दृष्याला मारक ठरते.

अभिनय (Acting ): 

शाहिद कपूर ने अभिनय चांगला केला आहे अँग्री यंग मॅन चा अभिनय हा त्याचा हातखंडा झालेला आहे. कबीर सिंग, जर्सी आणि फर्जी यानंतर येणारी, तशाच पठडीतली ही त्याची चौथी भूमिका. डायना पेंटी, रोनित रॉय, संजय कपूर आणि राजीव खंडेलवाल यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.

Bloody Daddy Film  Review. Diana Penty in Bloody Daddy
डायना पेंटी – ब्लडी डॅडी फिल्म मध्ये अदिती च्या भूमिके मध्ये

Verdict (कौल ) : 

अपहरण नाट्य जरी वाटत असले तरी क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत नेणार कथानक येथे नाही. काही प्रसंगात उत्कंठा वाढते पण तसे प्रसंग कमी आहेत. असे असले तरीही, केवळ दोनच तास चित्रपटाची लांबी असल्यामुळे आणि चित्रपटाला एक वेग असल्यामुळे आपण काही प्रमाणात गुंतून राहतो. जास्त तर्क न लावता एक ॲक्शन पट तुम्हाला फ्री मध्ये पहायचा असेल तर जिओ सिनेमा वर तुम्ही हा पाहू शकता. तुम्हांला थ्रिलर, रहस्य चित्रपट आवडत असतील तर तुम्ही हे रिव्यू देखील वाचू शकता. वाळवी , दहाड आणि स्कुल ऑफ लाईज.

Leave a Comment