मेरी ख्रिसमस। Merry Christmas Movie Review in Marathi  

Merry Christmas Movie Review in Marathi

Merry Christmas Movie Review in Marathi मेरी ख्रिसमस घडतो ८०-९० च्या दशकात ज्या वेळेस मुंबईला बॉम्बे म्हंटलं जातं असे.अल्बर्ट (विजय सेतुपती) हा ख्रिसमस च्या दिवशी बॉम्बे मध्ये आपल्या घरी आला आहे. काही वर्षापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तो आज प्रथमच घरी आला आहे. अश्या वेळेस ख्रिसमसच्या संध्याकाळी तो फिरायला घराबाहेर पडतो आणि एका रेस्टॉरंट मध्ये त्याची मारिया (कॅटरिना कैफ) आणि तिची छोटी मुलगी ॲनी (परी शर्मा) यांच्याशी ओळख होते. गप्पा मारता मारता तो मारियाच्या घरी जातो तेव्हां तिथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून येतो.

कसा आहे डंकी चित्रपट ? । Dunki Movie Review in Marathi

Dunki Movie Review in Marathi

Dunki Movie Review in Marathi मुख्यत्वे चित्रपट घडतो तो ९० च्या दशकात. मन्नू (तापसी पन्नू),  बुग्गु (विक्रम कोचर), बल्ली (अनिल ग्रोवर ) आणि सुखी (विकी कौशल ) ह्या चारही जणांना त्यांच्या त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक, वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी इंग्लडला जायचं आहे.परंतु व्हिजासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेत ते बसत नाहीयेत. त्याच वेळेस आर्मी ऑफिसर असणारा हरदयाळ सिंग धिल्लोन उर्फ हार्डी (शाहरुख खान) आपल्याला मरणापासून ज्याने वाचवले त्याचा शोध घेत त्यांच्या गावात येतो आणि ह्या शोधाची परिणती म्हणजे ह्या सर्व लोकांना परदेशात पोहचवण्याचे एक ध्येय त्याला मिळते.

आर्चिज – चित्रपट कसा आहे ?। The Archies Movie Review in Marathi   

Archies Movie Review in Marathi

Archies Movie Review in Marathi चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आलेले सात मित्र-मैत्रिणी आर्चि (अगस्त्य नंदा), वेरॉनिका (सुहाना खान), बेट्टी (ख़ुशी कपूर), रेज्जी (वेदांग रैना), जगहेड(मिहीर अहुजा), एथेल (अदिती सैगल), डिल्टन (युवराज मेंढा) त्यांच्या पालकांसोबत रिव्हर डेल नामक एका सुंदर अश्या काल्पनिक शहरात राहत आहेत. वेरॉनिकाच्या वडिलांना रिव्हरडेल मधील ग्रीनपार्क हटवून तिथे मोठे हॉटेल बांधायचे आहे आणि पैशाच्या जोरावर ते सर्वाना विकत घेत आहेत. हे कळल्यानंतर सातही मित्र मैत्रिणी एकत्र येतात आणि सर्व शहराला देखील एकत्र आणून ग्रीनपार्क वाचवतात. 

ॲनिमल – अतिरंजित आणि हिंसक । Animal Movie Review in Marathi 

Animal Movie Ranbeer kapoor

Animal Movie Review in Marathi  बापाचा आदर आणि प्रेम मिळवण्यासाठी मुलानी लहानपणापासून केलेली धडपड आणि ते न मिळाल्यामुळे त्याचं हळूहळू हिंस्त्र पशूत होत जाणारा रूपांतर असं काही दिग्दर्शकाला दाखवायचं असावं. पण पसरट पटकथा आणि अनावश्यक प्रसंग यामुळे चित्रपट लांबट आणि कंटाळवाणा वाटतो. 

जाने जान रिव्यू – जयदीप अहलावत च्या अभिनयाने सांभाळलेला चित्रपट । Jaane Jaan Movie Review in Marathi

Jaane Jaan Movie Review in Marathi

Jaane Jaan Movie Review in Marathi जयदीप अहलावत ने या चित्रपटामध्ये कमाल काम केले आहे आणि त्याला विजय वर्माने तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे. मितभाषी, बुध्दिमान, एकाकी आणि मायाला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी धडपडणारा मॅथ्स टीचर नरेन व्यास – जयदीप अहलावत च्या अभिनयामुळे कायम लक्षात राहील. नरेन च्या तोंडी चित्रपटात अनेक वेळा वाक्य येते कि “मैं सब संभाल लुंगा “ त्याच्या अभिनयाने खरंच त्याने हा चित्रपट सांभाळून घेतला आहे असंच म्हणावं लागेल. 

Bawaal Movie Review। बवाल – महत्त्वाकांक्षी पण फसलेला चित्रपट

Bawaal Movie Review Bawaal Postar बवाल मुव्ही रिव्यू

लखनऊ मध्ये राहणारा अजय दीक्षित उर्फ अज्जू भैया (वरूण धवन) हा शाळेत इतिहासाचा शिक्षक आहे. समाजामध्ये स्वतःची एक चांगली इमेज (प्रतिमा) निर्माण करण्यासाठी त्याने स्वतःबद्दल अनेक खोट्या गोष्टी पसरविलेल्या आहेत, घरची बेताची परिस्थिती असतानाही त्याने अनेक महागड्या वस्तू कर्जावर घेतलेल्या आहेत. त्याचं एकच ध्येय वाक्य आहे. “माहौल ऐसा बनाओ कि लोग माहौल याद रखें, ना कि उसका रिजल्ट।”

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू – पहा केवळ कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित कथेसाठी | Lust Stories season 2 Review

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू

लस्ट स्टोरीज सीजन २ रिव्यू : लस्ट म्हणजे वासना- तीव्र इच्छा, ती वेगवेगळ्या गोष्टींची असू शकते – खाण्याची, पिण्याची, संपत्तीची, पदाची किंवा प्रसिद्धीची. पण वासना म्हंटल की प्रामुख्याने आपल्यासमोर येते ती कामवासना आणि त्यासोबतच दबक्या आवाजात त्याबद्दल होणारी कुजबुज.

टिकू वेड्स शेरू मुव्ही रिव्यू – भावनाशून्य आणि रट्याळ | Tiku Weds Sheru Movie Review

Tiku Weds Sheru Movie Review Poster

Tiku Weds Sheru Movie Review गावाकडची बंडखोर मुलगी जीचा आधीपासून एक बॉयफ्रेंड आहे आणि केवळ घरच्यांच्या दबावामुळे जिला मुलं पहावी लागतात – अशावेळेस शहरातून आलेला मुलगा तिच्या गुण दोषांकडे दुर्लक्ष करून केवळ तिच्या दिसण्याने तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो. हे ‘तनू वेड्स मनू’ मध्ये असणारं ढोबळ कथानकं इथेही येते.

आय लव यू हिंदी फिल्म रिव्यू |I love you Hindi Film Review

I love you Hindi Film Review

गोदावरी आणि पुणे ५२ सारखे चित्रपट देणाऱ्या निखील महाजन ची ही पहिलीच हिंदी फिल्म. निखिलच्या चित्रपटांबद्दल ते कसे असतील हा अंदाज करणे थोडं कठीण काम आहे. काही वेळेस तो फारच कमाल चित्रपट काढतो, तर काही वेळेस त्याच्या बाजी किंवा बेतालसारख्या फिल्म- वेब सिरीज पाहून निराशा होते. I love you Hindi Film Review

ब्लडी डॅडी फिल्म रिव्ह्यू | Bloody Daddy Film  Review. 

Bloody Daddy Film  Review. Shahid Kapoor in Bloody Daddy

Bloody Daddy Film  Review चित्रपटाची कथा घडते करोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या काळात. नार्कॉटिक्स ऑफिसर असणारे सुमैर (शाहिद कपूर) आणि जग्गी (जिषान कादरी- गँग्स ऑफ वसईपुर फेम डेफिनेट) एका गाडीवर हल्ला करून 50 कोटी रुपयाचे ड्रग्स लुटतात, येथे लुटतात हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे नार्कोटिक्स ऑफिसर असूनही त्यांचा हा माल विकून पैसा कमविण्याचा मानस असल्याचे आपल्याला कळते.