शांतीत क्रांती | Shantit Kranti Marathi Web Series Season One Review

Shantit Kranti Marathi Web Series Season One Review

Shantit Kranti Marathi Web Series Season One Review ही गोष्ट आहे प्रसन्न (ललित प्रभाकर) दिनार (अलोक राजवाडे) आणि श्रेयस (अभय महाजन) या तिघा मित्रांची. लहानपणी तिघांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पाहिला आणि तेव्हापासून ते आज तिशीत येई पर्यंत ते त्याने भारावलेले आहेत. गोव्याच्या अनेक ट्रिपा त्यांनी केल्यात. आपापसात सिद,आकाश आणि समीर कोण? यावरून त्यांचे सतत वाद चालू असतात. सीरीज मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘दिल चाहता है’ चे अनेक संदर्भ येतात. गोवा ट्रिप आखणे, ट्रेन सोबत कार ने रेस लावणे, त्यांच्या बालपणी त्यांनी एकत्र ‘दिल चाहता है’ पहायला जाणे असे अनेक. 

एका काळेचे मणी रिव्यू | Eka Kaleche Mani Marathi Web Series Review

Eka Kaleche Mani Marathi Web Series Review

Eka Kaleche Mani Marathi Web Series Review श्रीनिवास काळे (प्रशांत दामले) आणि अनुराधा काळे (पोर्णिमा मनोहर) यांचा आयर्लंड रिटर्न गुप्तरोग तज्ञ मुलगा विवस्वान काळेला (ऋषी मनोहर) लग्न करायला तयार करण्यासाठी काळे कुटुंबाने केलेले विविध प्रयत्न हे सिरीजचं मुख्य कथासूत्र आहे.  

दो गुब्बारे – एक आपली वाली गोष्ट | Do Gubbare Web Series Review in Marathi 

Do Gubbare Web Series Review

Do Gubbare Web Series Review in Marathi पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी भारतभरातून अनेक तरुण-तरुणी येत असतात, इंदोर वरून आलेला रोहित शुक्ला (सिद्धार्थ शॉ) हा त्यापैकीच एक. पुण्याच्या प्रभात रोडवरील घनकुंज बंगल्यात एकटे राहणाऱ्या आजोबांकडे (मोहन आगाशे) तो पेईंग गेस्ट म्हणून राहायला येतो. 

Adhura Web Series Review | अधुरा वेब सीरिज रिव्यू  – न जमलेला भयपट.

Adhura Web Series Postar. Adhura Web series review

२००७ सालच्या बोर्डिंग स्कूल च्या बॅचचे विद्यार्थी २०२२ साली गेट-टुगेदर साठी उटी मधील बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र येतात. Adhura Web series Review

जी करदा वेब सीरीज रिव्यू | Jee Karda Web Series Review

Jee Karda Web Series Review - Poster

वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून येणारे सात मित्र-मैत्रिणी (चार मुलं आणि तीन मुली) ह्यांची हि गोष्ट आहे. वयाच्या पंधराव्या वर्षीचं, त्याचं शालेय जीवन आणि तिशीच्या उंबरठ्यावरचं त्याचं आजचं आयुष्य, अशी दोन समांतर कथानकं आपल्याला फ्लॅशबॅक आणि आत्ताचा काळ अशी पाहायला मिळतात. Jee Karda Web Series Review

स्कूल ऑफ लाईज । School of Lies Hotstar Review

School of Lies Hotstar Review वीर पचिसीया आणि दिव्यांश द्विवेदी

School of Lies Hotstar Review सातवीत शिकणारा १२ वर्षीय शक्ती साळगावकर (वीर पचिसीया) हा ‘राईज’ नामक एका बोर्डिंग स्कूल मधून बेपत्ता होतो. सुरुवातीला शक्तीचा खोडसाळपणा असेल असे वाटते, पण बरेच तास उलटल्यानंतरही तो जेव्हा सापडत नाही, त्यावेळेस त्याच्या पालकांना आणि पोलिसांना बोलविण्यात येते. हे सर्व होत असताना बोर्डिंग मधील अनेक रहस्य उलगडतात.

स्कूप रिव्ह्यू | Scoop Netflix Web Series Review

scoop-netflix-web-series-review

२०११ सालात घडणारी ही गोष्ट आहे जागृती पाठक (कश्मिरा तन्ना) हिची. जी गुन्हेगारी पत्रकारितेला वाहिलेले ‘ईस्टर्न एज’ नामक पेपर मध्ये ‘डेप्युटी ब्युरो चीफ’ म्हणून काम करत आहे. सातत्याने पहिल्या पानावरची एक्सक्लुझिव्ह न्यूज किंवा ‘स्कूप’  आणून ती आज या पदाला पोचली आहे. त्यामुळे सतत ती नविन ‘स्कूप’ च्या शोधात असते. सात वर्ष गुन्हेगारी पत्रकारितेमध्ये काढल्यामुळे अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि अंडरवर्ल्ड मधील काही लोक हे तिच्या ओळखीचे झाले आहेत. Scoop Netflix Web Series Review

दहाड रिव्ह्यू | Dahaad Web series Review

Dahaad Webseries Review- Sonakshi Sinha

ही सिरीज जरी एका सिरीयल किलरचा पाठपुरावा करत असली तरी याच्या केंद्रस्थानी आहे पोलीस सब इन्स्पेक्टर असणारी अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा). आणि तिने या समाज व्यवस्थे विरुद्ध दिलेली दहाड (गर्जना). या समाज व्यवस्थेत जिथे जात, लिंग, धर्म बघून माणसाशी कसं वागायचं हे ठरवलं जातं अशा व्यवस्थेमध्ये ती मागासवर्गातून आलेली एक अविवाहित महिला पोलीस इन्स्पेक्टर आहे. Dahaad Web series Review

सास बहू और फ्लेमिंगो । Saas Bahu Aur Flamingo Review

Saas Bahu Aur Flamingo

सासु सुनांवर चालणाऱ्या मालिकांचा रतीब वर्षानुवर्षे मराठी तसेच हिंदी चॅनल्सवर प्रेक्षक पाहत आलेले आहेत. सासु सुनांमधील भांडणं, एकमेकांविरुद्धची कटकारस्थानं आणि त्यात मुलगा/नवऱ्याची होणारी अडचण किंवा एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर अशा ढोबळ कथासूत्रांभोवती या मालिका वर्षानुवर्षे चालत असत. अजूनही अशा काही मालिका टीव्हीवर चालू आहेत. 

ओटीटी आल्यापासून सासू आणि सुनांच्या या कथानकाला धक्का देणाऱ्या काही सिरीज आल्या. काहींनी ते प्रभावीरीत्या मांडलं (सास बहू और आचार pvt ltd – zee5) तर काही भरकटल्या. ‘सास बहू और फ्लेमिंगो’ हि दुसऱ्या प्रकारात मोडते. Saas,Bahu Aur Flamingo Review

ताझा खबर | Taza Khabar Review in Marathi

चाळीत राहणारा वसंत गावडे उर्फ वस्या (भुवन बाम) हा सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर शौचालयाची निगा राखण्याचे आणि शुल्क गोळा करण्याचे काम करत आहे. त्याची आई (अतिषा नाईक) इतरांकडे मोलकरणीचे काम करत आहे तर व्यसनाधीन वडील (विजय निकम) एका फॅक्टरीत काम करत आहे. Taza Khabar Review in Marathi