प्रभावहीन कटपुतली | Cuttputalli film review in Marathi

फिल्म :  कटपुतली
कालावधी :  २ तास १५ मिनिटे
दिग्दर्शक: रंजीत तिवारी
लेखक : असीम आरोरा
सिनेमॅटोग्राफी : राजीव रवी 
मुख्य कलाकार :  अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंग, सर्गुन मेहता, चंद्रचूर सिंग, रिशिता भट, सुजित शंकर 
कुठे पाहू शकता : डिज्नी प्लस हॉटस्टार । Cuttputlli OTT platform

मूळ चित्रपट । Cuttputlli is remake of which film? 

‘कटपुतली’ हा ‘रत्सासन’ या तमिळ चित्रपटावर अधिकृतरित्या आधारलेला आहे.  हे लिहिणाऱ्या लेखकाने मूळ चित्रपट ‘रत्सासन’ हा पाहिल्या नसल्यामुळे दोन्ही चित्रपटांची तुलना या लेखा मध्ये नाही.  एक नविन चित्रपट म्हणूनच कटपुतली कडे पाहिलं गेलं आहे. 

गोष्ट काय आहे ? । What is the story of Cuttputlli?

चित्रपट गोष्ट सांगतो, चित्रपट दिग्दर्शक बनू इच्छिणाऱ्या 36 वर्षीय अर्जन सेठी (अक्षय कुमार) नामक तरुणाची. बीकॉम आणि डिप्लोमा इन क्रिमिनल सायकोलॉजी केलेल्या अर्जनने सात वर्ष जगातील सिरीयल किलरचा अभ्यास करून एक स्क्रिप्ट लिहिली आहे. अनेक निर्मात्यांकडून स्क्रिप्टला आलेल्या नकारानंतर आणि ताई (रिशिता भट) आणि दाजी (चंद्रचूर सिंग) यांच्या आग्रहाखातर तो पोलीस भरतीची परीक्षा देतो आणि लगेच निवड होऊन सब इन्स्पेक्टर म्हणून कसौली येथे रुजू होतो.  काहीच दिवसात, एका शाळकरी मुलीचा चेहऱ्यावर निर्घुणपणे वार करून खून केला जातो.  एकापाठोपाठ एक होणाऱ्या शाळकरी मुलींच्या हत्या हे एका सीरियल किलर चे काम आहे, हे बऱ्याच प्रयत्ना नंतर एसएचओ गुडीया परमार (सर्गुन मेहता) यांना तो पटवून देतो आणि सरते शेवटी सीरियल किलर ला शोधून काढतो. 

अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंग कट्पुटली मधील एका गाण्यात
अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंग कट्पुटली मधील एका गाण्यात

चित्रपट कसा आहे । How is Cuttputlli?

बचन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन नंतर या वर्षातील अक्षय कुमारची ही चौथी फिल्म. वार्षिक सरासरी काढली असता अक्षय कुमार वर्षाला चार फिल्म करतो म्हणजे दर तीन महिन्याला त्याची एक फिल्म प्रदर्शित होते. चित्रपटांमध्ये विषयाचे वैविध्य जरी असलं, तरी त्यातील भूमिकेच्या तयारीसाठी तो कितपत वेळ देतो याबद्दल शंका आहे.  

इथे नमूद करण्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षातील अक्षय कुमारच्या रिलीज झालेल्या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहिला असता, तो जवळपास सारखाच दिसतो. त्याचा अभिनय ते पात्र न वाटता अक्षय कुमारच वाटतं राहतो.  विनोदी चित्रपटांसाठी कदाचित त्याच्या अक्षयकुमार असण्याची अडचण वाटत नसावी. पण ज्यावेळेस ‘कटपुतली’ सारखा एखादा गंभीर विषय निवडला जातो, त्यावेळेस ही त्रुटी फार ठळकपणे समोर येते.  

त्यातही तुम्ही जेव्हा ५४ वर्षाच्या अक्षय कुमारला ३६ वर्षाचा दाखवता त्यावेळेस तर हे जास्त प्रकर्षाने जाणवते. वयाकडे दुर्लक्ष करून आपण चित्रपट पुढे पाहायला लागतो त्याच वेळेस “टू यंग टू बी हर फादर” ” अश्या विरोधाभासी संवादांमधून त्याचे वय अधिकच अधोरेखित केले जाते.  

दोन गंभीर प्रसंगाच्या मध्ये येणारे गाणे तसेच अनावश्यक विनोदी प्रसंग चित्रपटातील एकूण गंभीर कथेला मारक ठरतात.  अर्जन च्या ताई आणि दाजींचे सोईस्कर रित्या गावाला निघून जाणे.  खरा खुनी समोर येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता स्वतःची गोष्ट सांगण्यात सुरुवात करणे. शेवटाकडे येणाऱ्या या गोष्टी फारच घाईघाईने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे शेवटाकडे येणारा रहस्यभेद इतका परिणामकारक होत नाही. 

तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार हा चित्रपट पाहू शकता. 

Leave a Comment