गोविंदा नाम मेरा  – माफक मनोरंजन | Govinda Naam Mera Movie review in Marathi

फिल्म :  गोविंदा नाम मेरा 
कालावधी :  २ तास ११ मिनिटे
दिग्दर्शक: शशांक खैतान
लेखक : शशांक खैतान
सिनेमॅटोग्राफी : विदुषी तिवारी 
मुख्य कलाकार :  विकी कौशल, कियारा आडवाणी, भुमी पेडणेकर, रेणुका शहाणे, अमेय वाघ, सयाजी शिंदे, दयानंद शेट्टी, तृप्ती खामकर  
कुठे पाहू शकता : डिज्नी प्लस हॉटस्टार । Govinda Naam Mera OTT platform

लॉक डाऊन च्या काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणारे बरेचशे चित्रपट सुमार दर्जाचे होते. जे चित्रपट बनून तयार आहेत आणि ज्या चित्रपटांची थिएटर वर चालण्याची खात्री नाही असे बरेचसे चित्रपट, निर्माते ओटीटी  प्लॅटफॉर्मला मोठ्या रकमेत विकत होते. लोकांनाही लॉक डाऊन काळात नवीन काहीतरी पाहायला मिळतय म्हणून ते चित्रपट पहिले जात होते.

त्यामुळे गेल्या काही काळापासून निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला विकलेल्या बऱ्याचशा चित्रपटांचा दर्जा हा सुमार राहत आलेला आहे.  त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी स्वतः निर्माण केलेला चित्रपटांचा अर्थातच काही प्रमाणात अपवाद आहे. 
अशा वेळेस करणं जोहर च्या ‘धर्मा प्रोडक्शन’ ने निर्माण केलेला ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट थिएटर मध्ये रिलीज न करता थेट ओटीटी वर रिलीज केला जातो, त्यावेळेस अर्थातच त्या बद्दल अपेक्षा फारच कमी होत्या.  कमी अपेक्षा असताना हा चित्रपट पहिला आणि अपेक्षेपेक्षा बराच चांगला वाटला. 

Govinda Naam Mera Poster
Govinda Naam Mera Poster

गोष्ट काय आहे ? । What is the story of Govinda Naam Mera?

चित्रपट गोष्ट सांगतो गोविंदा वाघमारेची  (विकी कौशल). गोविंदा हा एक नृत्य दिग्दर्शक आहे. आपल्या बायको सोबत गौरी (भूमी पेडणेकर) तो नाखुशीने राहत असतो. त्याला खरंतर आपल्या बायकोला सोडून त्याची मैत्रीण असलेल्या आणि त्याच्यासोबत नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या सुकू (कियारा आडवाणी) सोबत लग्न करायचे आहे. गौरी ला देखील त्याला सोडायचे असते परंतु त्यासाठी तीला हुंड्यात दिलेले दोन कोटी रुपये परत हवे असतात.

या सगळ्यात चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे गौरी आणि गोविंदा राहत असलेला १५० कोटी किमतीचा ‘आशा निवास’ नावाचा बंगला. गोविंदाच्या वडिलांनी जे तमिळ चित्रपट सृष्टीतील नावाजलेले ॲक्शन डिरेक्टर होते, मरताना हा बांगला गोविंदाच्या आईच्या -आशा वाघमारेच्या (रेणुका शहाणे) नावावर केलेला असतो. आता अडचण ही आहे की, गोविंदाच्या वडिलांची आधीपासूनची बायको आणि तिच्यापासून एक मुलगा त्या बंगल्यावर हक्क दाखवतायंत आणि गेल्या 14 वर्षापासून ती केस कोर्टात चालू आहे.

यामध्ये अनेक उपकथा येतात जसे की गोविंदाला इंस्पेक्टर जावेद खान (दयानंद शेट्टी) याला 2 लाख, राजकारणी अजित धारकर (सयाजी शिंदे) याला 30 लाख तर एका सीनियर वकीलाला केस सेटलमेंट साठी दोन लाख देणे आहे. यासाठी त्याला बंगल्याची केस लवकरात लवकर निकाली लावायची आहे. ह्या मध्ये गोविंदाला त्याचा वकील मित्र कौस्तुभ गोडबोले (अमेय वाघ) मदत करतो आहे. यातच ड्रुग्स ची चोरी आणि एक खून होतो आणि संशयाची सुई सर्वांभोवती फिरायला लागते. विनोदी अंगाने जाणारा चित्रपट अचानक रहस्यमय बनतो. अनेक धक्के-वळणे घेत सर्व गोष्टींचा खुलासा करत चित्रपट संपतो. 

कियारा अडवाणी
कियारा अडवाणी – गोविंदा नाम मेरा मध्ये

चित्रपट कसा आहे । How is Govinda Naam Mera?

घरवाली आणि बाहेरवाली मध्ये फासलेला नवरा आणि त्यातून घडत जाणारे अनेक प्रसंग आपण अनेक चित्रपटात यापूर्वी पाहिलें असतील. पण इथे चित्रपटाची कथा तेवढीच नाही. खून, चोरी, विश्वासघात अशी अनेक रहस्यमय वळणं चित्रपट घेतो आणि आणि नक्की काय घडतंय? खरा खुनी कोण? कोण कोणाला फसवतंय? ह्या उत्सुकतेने आपणही चित्रपट शेवटपर्यंत पाहत राहतो. 

असे असले तरी चित्रपटामध्ये अनेक गोष्टी खटकतात देखील गोविंदा आणि गौरी ची मोलकरीणचं  (तृप्ती खामकर) गोविंदाशी नेहमीच चढ्या आवाजात आणि तुसडेपणाने का बोलते? कोणी सख्या बहिणीला सतत २४ तास अपंगत्वाच खोटं नाटक करून कसे फसवू शकते? अश्या अनेक अतार्किक गोष्टी इथे येतात. 

परंतु सर्वानी केलेली प्रामाणिक कामं आणि काही मजेशीर प्रसंग चित्रपटात मजा आणतात. विकी कौशल प्रथमच विनोदी भूमिकेमध्ये दिसला आहे. मराठी भाषिकांसाठी पाहण्यासाठी एक कारण म्हणजे यात असणारे बरेचसे मराठी कलाकार. रेणुका शहाणे, तृप्ती खामकर,अमेय वाघ, आणि सयाजी शिंदे सर्वच जणांनी आपापली कामं उत्तम केली आहेत. या सर्वामध्ये भाव खाऊन जाते ती कियारा अडवाणी. कियारा केवळ दिसायला सुंदर नसून अभिनय देखील उत्तम करू शकते हे तिने अनेक चित्रपटांमधून दाखवून दिलेले आहे. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही.कमी अपेक्षा ठेवून पहिला तर एक माफक करमणूक चित्रपट नक्की करतो.

तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार वर हा चित्रपट पाहू शकता. 

Leave a Comment