कटहल हिंदी फिल्म रिव्ह्यू | Kathal Hindi Film  Review

हलकं फुलकं मनोरंजन. 

फिल्म :  कटहल 
कालावधी :  १ तास ५५ मिनिटं
दिग्दर्शक:  यशोवर्धन मिश्रा
कथा पटकथा आणि संवाद :  अशोक मिश्रा, यशोवर्धन मिश्रा
छायाचित्रण: हर्षवीर ओबेरॉय
संकलक:  प्रेरणा सैगल
संगीत: राम संपत
मुख्य कलाकार :  सानिया मल्होत्रा, अनंत जोशी, विजय राज, राजपाल यादव, नेहा सराफ, ब्रिजेंदर काला, गोपाल सिंग, गोविंद पांडे, अंबरीश सक्सेना, रघुवीर यादव. 
कुठे पाहू शकता : नेटफ्लिक्स 
प्रौढ प्रमाणपत्र : कुटुंबासोबत पाहू शकता.

Kathal Hindi Film  Review राज्यसभा सदस्य असणारे जनता दल युनायटेड चे महिंद्र प्रसाद यांच्या दिल्लीतील तुघलक रोड वरील बंगल्याच्या बागेतून २०१४ च्या जून महिन्यात नऊ फणसांपैकी दोन फणसं चोरीला गेली, त्याची पोलिसात तक्रार नोंदविली गेली. फिंगरप्रिंट, फुटप्रिंट घेण्यात आले आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्यासारखं दहा पोलिसांची टीम तैनात करण्यात आली. भारतीय राजकीय आणि नोकरशाही व्यवस्थेची विवेकशून्यता दर्शविणारी हि एक सत्य घटना आहे. याच घटनेचा आधार घेऊन कटहल ही हिंदी फिल्म बनविण्यात आली आहे. 

Kathal Hindi Film Review- Saniya Malhotra
सानिया मल्होत्रा – कटहल चित्रपटात महिमा बसोर च्या भूमिकेत

गोष्ट काय आहे । What is the story of Kathal 

उत्तर प्रदेश मधील मोबा गाव. येथील आमदार असणारे मुन्नालाल पटेरिया (विजय राज) यांच्या बंगल्या समोरील बागेतील, मलेशियन जमातीचे दोन कटहल (फणसं), एके दिवशी चोरीला जातात. कटहल पासून बनणारे चमचमीत आचार खायला घालून, आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा पटेरिया चा मानस असतो. पण कटहल चोरीला गेल्यामुळे त्याची राजकीय महत्त्वाकांक्षा धोक्यात येते, त्यामुळे संपूर्ण पोलीस फोर्सला तो चोर शोधण्याच्या कामाला लावतो.

“कहने को हम इंडियन पीनल कोड फॉलो करते हैं, लेकिन काम करना पड़ता है इंडियन पोलिटिकल कोड के अनुसार।”

-अंग्रेज सिंह रंधावा (एस पी ) – कटहल फिल्म

या केसची जबाबदारी सोपविण्यात येते पोलीस इन्स्पेक्टर महिमा बसोर (सानिया मल्होत्रा) हिच्यावर. इतर सहकाऱ्यांसोबतच तिच्या टीम मध्ये आहे, तिचा प्रियकर असणारा कॉन्स्टेबल सौरभ द्विवेदी (अनंत जोशी). दोघांनीही पोलिसी प्रशिक्षण एकत्रित घेतलं, पण तिचं प्रमोशन झाल्यामुळे ती इन्स्पेक्टर बनून त्याची बॉस झाली आणि तो अजूनही कॉन्स्टेबल आहे. त्यात ती दलित वर्गातील आणि तो ब्राह्मण कुटुंबातील यामुळे त्यांच्या लग्नाला अडथळा होत आहे.

कटहल चोरीला गेल्याची बातमी मीडियापर्यंत पोहोचते. पत्रकार अनुज (राजपाल यादव) देखील बातमीचा पाठपुरावा करायला लागतो. या केसचा शोध घेत असतानाच,  एक मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती महिमाला कळते. त्यातून अशा प्रकारे अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत याचा उलगडा होत जातो. इथून कथा वेगळ्या दिशेला सरकते. कटहल च्या शोधा ऐवजी बेपत्ता मुलीचा शोध सुरू होतो.

शेवटी बेप्पता मुलगी सापडते का? महिमा आणि सौरभ च लग्न होतं का? आणि कटहल खरं कोणी चोरलं? या सर्व गोष्टी चित्रपटामध्ये पहाणचं उचित ठरेल.

कटहल चित्रपट कसा आहे ? | How is Kathal film ?

दोन फणसांच्या चोरीवर पोलीस केस होते आणि चोराचा शोध सुरू होतो ही कल्पनाच मजेशीर आहे. चित्रपटाची सुरुवात देखील मजेशीर होते. सुरुवातीची दहा-पंधरा मिनिटे पाहिल्यानंतर असे वाटते की आता एक मजेशीर चित्रपट पाहायला मिळेल, पण चित्रपट जसा पुढे jजातो तसं तितकी मजा येत नाही. विशेषतः चित्रपटाचा उत्तरार्ध थोडा भरकटल्या सारखा वाटतो.

Kathal Hindi Film  Review
अनंत जोशी – कटहल चित्रपटात सौरभ द्विवेदी च्या भूमिकेत

मागच्याच आठवड्यात आलेल्या ‘दहाड‘ या वेब सिरीज मधील अंजली भाटी आणि ‘कटहल’ मधील महिमा बसोर यात बरेच साम्य आहे. दोघीही महिला दलित इन्स्पेक्टर, दोघीही मुली बेपत्ता झाल्याची केस सोडवत आहे. दोघींनाही सहकार्याकडून आणि समाजाकडून अवहेलना-अपमान यांना सामोरे जावे लागत आहे आणि दोघीही निडरपणे त्याला सामोऱ्या जात आहेत.’दहाड’ एकदम गंभीर आहे तर कटहल अतिशय विनोदी पद्धतीने  विषय हाताळतो. 

जातीभेद, महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, राजकीय नोकरशाही व्यवस्थेची विवेक शून्यता असे अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करताना कटहल दिसतो. पण विनोदी अंगाने त्याच्याकडे पाहिल्यामुळे ते उथळ वाटतात. कदाचित समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी विनोद हे एक चांगले माध्यम आहे, पण अपेक्षा एवढीच आहे की त्या विषयांचं गांभीर्य देखील त्यातून सर्वांना कळेल.

Kathal Hindi Film  Review- Saniya Malhotra
सानिया मल्होत्रा – कटहल चित्रपटात महिमा बसोर च्या भूमिकेत

अभिनय (Acting ): 

सानिया मल्होत्रा ने अभिनयामध्ये बाजी मारलेली आहे. एकाच वेळेस निरागसपणे हसणारी आणि गुंडांशी दोन हात करून त्यांना लोळवणारी – तिने साकारलेली महिमा विश्वासनीय वाटते. स्वतःच्या घरात स्वतःचाच अर्ध पुतळा उभारणारा, पोलिसांकडून आपलं काम काढून घेणारा विक्षिप्त असा पटेरिया विजय राज यांनी सहजतेने साकारला आहे. राजपाल यादव चा पेहराव जरी वेगळा असला तरी त्याच्या अभिनयात तोच तोच पणा यायला लागला आहे, असं वाटतं.

Kathal Hindi Film  Review
विजय राज – कटहल मधील मुन्नालाल पटेरिया च्या भूमिकेत

Verdict (कौल ) : 

तुम्हांला जुण्या काळातील ऋषिकेश मुखर्जींचे चित्रपट आवडत असतील, तर सामाजिक भाष्य करण्याच्या नादात जरी थोडा घोळ होत असला, तरी एक हलकाफुलका मनोरंजन चित्रपट म्हणून आणि सानिया मल्होत्राच्या अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स वर नक्की पाहू शकता.


Is Kathal film Based on Real Story | कटहल फिल्म खऱ्या घटनेवर आधारित आहे का ?

हो. राज्यसभा सदस्य असणारे जनता दल युनायटेड चे महिंद्र प्रसाद यांच्या दिल्लीतील तुघलक रोड वरील बंगल्याच्या बागेतून २०१४ च्या जून महिन्यात नऊ फणसांपैकी दोन फणसं चोरीला गेली, त्याची पोलिसात तक्रार नोंदविली गेली. फिंगरप्रिंट, फुटप्रिंट घेण्यात आले आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्यासारखं दहा पोलिसांची टीम तैनात करण्यात आली. भारतीय राजकीय आणि नोकरशाही व्यवस्थेची विवेकशून्यता दर्शविणारी हि एक सत्य घटना आहे. याच घटनेचा आधार घेऊन कटहल ही हिंदी फिल्म बनविण्यात आली आहे. 

खालील समाज माध्यमांवरती तुम्ही आम्हांला फॉलो करू शकता.

Leave a Comment