आय लव यू हिंदी फिल्म रिव्यू |I love you Hindi Film Review

I love you Hindi Film Review

गोदावरी आणि पुणे ५२ सारखे चित्रपट देणाऱ्या निखील महाजन ची ही पहिलीच हिंदी फिल्म. निखिलच्या चित्रपटांबद्दल ते कसे असतील हा अंदाज करणे थोडं कठीण काम आहे. काही वेळेस तो फारच कमाल चित्रपट काढतो, तर काही वेळेस त्याच्या बाजी किंवा बेतालसारख्या फिल्म- वेब सिरीज पाहून निराशा होते. I love you Hindi Film Review

गोदावरी  | ( Godavari Marathi Movie Review)

Godavari Marathi Movie Review

देशमुख कुटुंब पिढ्यान पिढ्या नाशिक ला गोदावरी काठी राहत आले आहे. देशमुख कुटुंबाच्या मालकीच्या असणाऱ्या गाळ्यांचे भाडे गोळा करण्याचं काम निशिकांत देशमुख (जितेंद्र जोशी) करतोय. तेच तेच काम करून तो कंटाळला आहे. आयुष्यात सगळे निर्णय गाडी घेण्यापासून ते लग्न करण्यापर्यंत कुटुंबाने लादले असे त्याचे म्हणणे आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाला तो आजूबाजूच्या परिस्थितीला आणि कुटुंबाला दोष देतो. त्यामुळेच सगळ्यांवरच त्याचा राग आहे. वडील (संजय मोने) आणि त्याच्यामध्ये कोणताच संवाद नाही. आई (नीना कुलकर्णी ) आणि बायको (गौरी नलावडे) यांच्याशी तो तुसडेपणाने बोलतो. Godavari Marathi Movie Review