काय आहे ‘ब्रम्हास्त्र’ आणि कोणती आहेत ९ शक्तिशाली अस्त्र ? । What is Brahmastra and 9 Powerful Astras?

आयान मुखर्जी चा ‘ब्रम्हास्त्र’ 9 सप्टेंबरला रिलीज होत आहे. तर जाणून घेऊ त्याने पुराणातून प्रेरणा घेऊन कल्पिलेले हे ‘अस्त्रांचे विश्व’ अर्थात ‘ब्रम्हास्त्र’. 

यातील काही अस्त्र हि पंचमहाभूतांपासून तयार झाली आहेत तर काही प्राण्यांमधील शक्ती मधून. अस्त्रवर्स म्हणजे ‘अस्त्रांचे विश्व’  हे विश्वाच्या ९ अस्त्रांचे संयोजन आहे. त्यापैकी प्रत्येकाचे स्वतःचे नाव आणि शक्ती आहे.

प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या कठोर तपश्चर्येनंतर, ब्रह्म शक्तीतून या अस्त्रांची निर्मिती होते. तेव्हांपासून हे ऋषी- मुनींच्या पिढ्या ज्यांना  ‘ब्रम्हांक्ष’ म्हटले जाते, समाजामध्ये लपून राहून मानवाच्या प्रगतीमध्ये सहाय्य करण्यासाठी या अस्त्रांचे रक्षण करत आहेत. 

१.वानरास्त्र | Vanarastra

यामध्ये एका महावानराची – वानरांच्या सैनेची शक्ती भरलेली आहे. 
शाहरुख खान कडे नंदीअस्त्राची शक्ती देण्यात आली आहे.

२.नंदीअस्त्र | Nandiastra

जे हिंदू पौराणिक कथांमध्ये नंदी, म्हणजेच बैलाबद्दल बोलते.यामध्ये एक हजार बैलांची शक्ती एकवटलेली आहे. नागार्जुन कडे नंदीअस्त्राची शक्ती असल्याचं दिसून येतंय. 

३.प्रभास्त्र | Prabhastra

हे अस्त्र म्हणजे “प्रकाशाची तलवार”, जो प्रभास-अस्त्र या शब्दापासून आला आहे. या अस्त्रामध्ये आकाशातून पडणाऱ्या विजेची शक्ती सामावलेली आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे प्रभास्त्र ची शक्ती असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

४.नाग धनुष अस्त्र | Nagadhanush Astra

असं धनुष्य रुपी अस्त्र ज्यातून बाणा ऐवजी विषारी नागांचा वर्षाव होतोय. 

५.गजास्त्र | Gajastra

हजारो हत्तींचे बळ असणारे हे गजास्त्र.  

६.जलास्त्र | Jalastra

पाण्याइतकेच शांत पण गरज असताना शक्तिशाली. कधी नदी सारखी शांतता तर कधी त्सुनामी सारखे रुद्ररूप धारण करणारे. जलास्त्र असे अस्त्र जे सौम्य आणि नष्ट करणारे देखील आहे. दिपीका पदुकोण कडे जलास्त्रची शक्ती असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

७.पवनास्त्र | Pawanastra

म्हणजे हवा. म्हटले तर झुळूक होऊन थंडावा देऊ शकते, नाहीतर वादळ होऊन उध्वस्त करू शकते. 

८.अग्न्यअस्त्र | Agnyastra

म्हणजे आग. अस्त्रवर्स मधील सर्वात जंगली आणि शक्तिशाली अस्त्र. म्हटले तर तुम्हाला प्रकाश देऊ शकते किंवा जाळून राख करू शकते.  चित्रपटामध्ये रणबीर कपूर चे  पात्र शिवा हेच अग्न्यअस्त्र चे रूप आहे.  

९.ब्रम्हास्त्र | Brahmastra

सर्वात पराक्रमी. सर्व अस्त्रांमध्ये सर्वात शक्तिशाली. सर्व अस्त्रांची ताकत याला जोडली गेलेली आहे.म्हणून त्याला नाव दिलं गेलं आहे देवी-देवतांमधील सर्वात शक्तिशाली अस्त्र ब्रम्हास्त्र.  

Leave a Comment